Vinod Kambli : विनोद कांबळीची तब्येत अद्यापही चिंताजनक, भावानं फॅन्सना केलं प्रार्थना करण्याचं आवाहन

Vinod Kambli : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटून विनोद कांबळी गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या तब्येतीच्या कारणांमुळे चर्चेत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Vinod Kambli : विनोद कांबळीला गेल्या वर्षी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
मुंबई:

Vinod Kambli : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटून विनोद कांबळी गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या तब्येतीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात विनोदला पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. त्यानंतर 21 डिसेंबर 2024 रोजी ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.   विनोदला  मूत्र संसर्ग (urinary infection) आणि क्रॅम्प्स (cramps) आल्यामुळे त्याला ठाण्यातील आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. माजी भारतीय क्रिकेटपटूबाबत त्याचा लहान भाऊ वीरेंद्र कांबळीने चिंताजन माहिती दिली आहे.

 'द विक्की लालवाणी शो' (The Vickey Lalwani Show) मध्ये बोलताना विनोदच्या धाकट्या भावाने सांगितले की, कांबळी अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही. सध्या तो बांद्रा येथील घरी असून, या आजारातून सावरत आहे, पण त्याला अजूनही नीट बोलता येत नाही.

'विनोदसाठी प्रार्थना करा'

वीरेंद्र म्हणाला, "तो सध्या घरी आहे. त्याची तब्येत सुधारत आहे, पण त्याच्यावर उपचार चालू आहेत. त्याला बोलताना त्रास होत आहे. त्याला पूर्णपणे बरे व्हायला वेळ लागेल, पण तो एक चॅम्पियन आहे आणि तो नक्कीच परत येईल. आशा आहे की तो पुन्हा चालायला आणि धावायला लागेल. मला त्याच्यावर खूप विश्वास आहे. मला आशा आहे की तुम्ही त्याला पुन्हा मैदानावर पाहू शकाल."

वीरेंद्र इतक्यावरच थांबला नाही. त्यानं विनोदच्या सर्व फॅन्सना त्याच्या मोठ्या भावाच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचे सार्वजनिक आवाहनही केले.

( नक्की वाचा : Vinod Kambli: 'विनोद कांबळीला कधीच पैशांची पर्वा नव्हती, त्यानं ती ऑफरही फेटाळली' माजी सहकाऱ्याचा गौप्यस्फोट )
 

तो पुढे म्हणाला, "त्याने 10 दिवसांचे पुनर्वसन (rehab) केले. त्याच्या संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली, ज्यात मेंदूचे स्कॅन आणि लघवीच्या तपासणीचा (urine test) समावेश होता. तपासणीचे निकाल ठीक होते; फार काही गंभीर समस्या नव्हत्या, पण त्याला चालता येत नसल्यामुळे त्याला फिजिओथेरपी (physiotherapy) करण्याचा सल्ला देण्यात आला. विनोदला अजूनही बोलताना अडखळतो, पण तो सुधारत आहे. जे लोक त्याच्यासाठी प्रार्थना करतात, त्यांना मला फक्त एवढेच सांगायचे आहे की तो नक्की बरा होईल. त्याला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची गरज आहे."

अर्थिक अडचणींचा डोंगर

आरोग्याच्या समस्यांबरोबरच, कांबळी आर्थिक संकटाचाही सामना करत आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये, कांबळीची पत्नी अँड्रिया हेविटने (Andrea Hewitt) सांगितले होते की, तिने 2023 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, पण पतीची 'असहाय्य स्थिती' पाहून तिने तो अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

पत्रकार सूर्यवंशी पांडे यांच्या पॉडकास्टमध्ये (podcast) बोलताना अँड्रियाने सांगितले की, तिने याआधीही कांबळीला सोडून जाण्याचा विचार केला होता, पण तिला त्याच्या आरोग्याची सतत काळजी वाटत होती.

( नक्की वाचा : Saaniya Chandhok : होणाऱ्या सुनबाईसोबत दिसला सचिन तेंडुलकर, फोटो आणि व्हिडिओ Viral )
 

ती म्हणाली, "मी त्याला सोडून गेले, तर तो असहाय्य होईल. तो एका लहान मुलासारखा आहे आणि ही गोष्ट मला त्रास देते. मला काळजी वाटते. मी माझ्या मित्रालाही सोडून जाणार नाही, पण तो त्याहूनही अधिक आहे. मला आठवतंय, असे काही क्षण होते, जेव्हा मी निघून जायचे. पण मग मला काळजी वाटायची: त्याने खाल्ले की नाही? तो अंथरुणावर व्यवस्थित आहे का? तो ठीक आहे का? मग मला त्याची चौकशी करावी लागायची आणि तेव्हा मला समजायचे की त्याला माझी गरज आहे."
 

Advertisement
Topics mentioned in this article