जाहिरात

Saaniya Chandhok : होणाऱ्या सुनबाईसोबत दिसला सचिन तेंडुलकर, फोटो आणि व्हिडिओ Viral

Saaniya Chandhok : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या साखरपुड्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Saaniya Chandhok : होणाऱ्या सुनबाईसोबत दिसला सचिन तेंडुलकर, फोटो आणि व्हिडिओ Viral
Saaniya Chandhok, Sachin Tendulkar : सानिया मुंबईतील अंधेरी येथे सारा तेंडुलकरच्या पिलेट्स अकादमीच्या उद्घाटनाला उपस्थित होती.
मुंबई:

Saaniya Chandhok : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या साखरपुड्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. महान क्रिकेटपटृ सचिनची होणारी सून सानिया चंडोकबाूत सर्वांनाच उत्सुकता आहे. अर्जुन आणि सानिया यांचं नातं जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच सानिया सचिन तेंडुलकर आणि त्याच्या  कुटुंबासोबत दिसली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, सानिया मुंबईतील अंधेरी येथे सारा तेंडुलकरच्या पिलेट्स अकादमीच्या उद्घाटनाला उपस्थित होती. ती तेंडुलकर कुटुंबासोबत होती आणि तिने काही विधींमध्येही भाग घेतला. हा व्हिडिओ पिलेट्स अकादमीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला होता.

सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब त्यांच्या हॉस्पिटॅलिटी (आतिथ्य) आणि खाद्य उद्योगातील सेवांसाठी प्रसिद्ध आहे. ते इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीचे मालक आहेत.

या रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा खासगी स्वरूपात झाला होता, त्यामुळे दोन्ही बाजूंचे फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबीयच या समारंभाला उपस्थित होते.

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन एक डावखुरा फास्ट बॉलर आहे. जो उपयुक्त बॅटर देखील आहे. अर्जुन देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. 17 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये त्याने 37 विकेट्स घेतल्या आहेत आणि 532 रन्स केले आहेत.

अर्जुनने 24 टी20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 27 विकेट्स घेतल्या असून 119 धावा केल्या आहेत. त्याने 18 एकदिवसीय (लिस्ट ए) सामने खेळले असून, त्यात 25 विकेट्स घेतल्या आणि 102 रन्स केले आहेत.

( नक्की वाचा : Who Is Ravi Ghai: बडे उद्योगपती... कोण आहेत सचिनचे होणारे व्याही रवी घई? वाचा सर्व माहिती )
 

अर्जुन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) मुंबई इंडियन्सकडून खेळला. त्याने 2023 मध्ये IPL मध्ये पदार्पण केले आणि त्या हंगामात चार सामने खेळले. त्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या. पुढच्या हंगामात अर्जुन फक्त एक सामना खेळू शकला आणि त्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com