Virat Kohli Alibaug Villa : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि त्याची अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा (Anuska Sharma) आता अलिबागकर होत आहेत. ते लवकरच अलिबागमधील नव्या व्हिलाची गृहपूजा करणार आहेत. त्यांचं भव्य घर तयार झालं असल्याची माहिती असून गृहप्रवेशाची तयारी सुरु आहे. विरुष्का लवकरच जवळच्या मित्रांना गृहप्रवेशाची पार्टी देणार आहे.
विराट आणि अनुष्का शर्मा हे नुकतेच 'गेट वे ऑफ इंडिया'ला दिसले होते. त्यावेळी ते दोघं अलिबागच्या घरी जाण्याची तयारी करत होते. अलिबागमध्ये या जोडप्याचं हॉलिडे होम आहे. त्यामध्ये शिफ्ट होण्याची तयारी आता सुरु झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसं आहे विराट-अनुष्काचं घर?
विराट आणि अनुष्काचं हॉलिडे होम जवळपास 8 एकर प्लॉटवर बांधण्यात आले आहे. या जोडप्यानं 2022 साली 19 कोटींमध्ये ही जागा खरेदी केली होती. जवळपास 10,000 चौरस फूट परिसरात हा व्हिला पसरला आहे.
स्टीफन एंटोनी ओल्म्सडाहल ट्रूएन आर्किटेक्ट्सनं सुंदर पद्धतीनं या व्हिलाची सजावट केली आहे. या व्हिलामध्ये तापमान नियंत्रित पूल, एक बेस्पोक किचन, चार बाथरूम, एक जकूझी, एक विस्तीर्ण बाग, बंदिस्त पार्किंग, स्टाफ क्वार्टर आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. एका रिपोर्टनुसार विराटनं हे घर बांधण्यासाठी 10.5 कोटी ते 13 कोटींपर्यंत गुंतवणूक केली आहे.
( नक्की वाचा : Team India : गंभीरच्या जवळचा टीम इंडियाच्या बाहेर, दिग्गज खेळाडूंनाही धक्का! BCCI बदलणार नियम )
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा गेट वे ऑफ इंडियावरुन त्यांच्या स्टाफसोबत एका बोटीतून जाताना नुकतेच दिसले होते. त्यांच्यासोबत घराच्या पूजेचं काही साहित्य होतं. तसंच एक पंडितही होता. त्यानंतर विराट आणि अनुष्कार अलिबागच्या घराची गृहपूजा लवकरच करणार असल्याची चर्चा सुरु झाली.
मुंबई आणि गुरुग्राममध्येही आहे घर
विराट कोहली सध्या त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. तो क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं होतं. विराट-अनुष्कानं गेल्या काही महिन्यांपासून मुंबईपासून दूर राहणंच पसंत केलं आहे. त्याचं मुंबईमध्ये 7,171 चौरस फूट परिसरात एक अलिशान घर आहे. या घराची किंमत 34 कोटी आहे. त्याचबरोबर विराटचं एक गुरुग्राममध्ये एक घर असून त्याची किंमत 80 कोटी आहे.
विराटसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा चांगलाच निराशाजनक ठरला. त्यानं 9 इनिंगमध्ये एक सेंच्युरीसह फक्त 190 रन केले. ऑफ स्टंपच्या बाहेरील बॉल खेळण्याच्या प्रयत्नात तो वारंवार आऊट होत होता. त्याच्या खेळातील या कमतरतेचा ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी फायदा उठवला. विशेषत: स्कॉट बोलंडनं विराटला चारवेळा आऊट केलं.
दरम्यान रणजी क्रिकेट स्पर्धेतील पुढील दोन सामन्यांसाठी दिल्लीच्या संभाव्य टीममध्ये विराटची निवड करण्यात आली आहे. सर्वच भारतीय क्रिकेटपटूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावं या मुद्यावर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरनं भर दिल्यानंतर विराटचा दिल्ली टीमच्या संभाव्य यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.