Australia vs India: भारतीय क्रिकेट टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. हा दौरा माजी कॅप्टन विराट कोहलीसाठी (Virat Kohli) अग्नीपरीक्षा ठरत आहे. पर्थ टेस्टमधील सेंच्युरी वगळता विराट या सीरिजमध्ये आत्तापर्यंत अपयशी ठरलाय. भारतीय दिग्गजांसह ऑस्ट्रेलियन मीडियानं त्याच्या खेळावर प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचवेळी मैदानाबाहेरही विराट चर्चेत आला आहे. चौथ्या टेस्टसाठी विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसह मेलबर्न विमानतळावर पोहोचला. त्यावेळी ऑस्ट्रेलियन चॅनलच्या पत्रकारावर चांगलाच संतापला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
मेलबर्न विमानतळावर हा संपूर्ण प्रकार घडला. विराट विमानतळावरुन बाहेर पडत होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियन चॅनेल छुप्या कॅमेऱ्यानं त्याच्या मुलांचं चित्रीकरण करत होते, असा त्याचा समज झाला. याच गोष्टीमुळे विराट नाराज झाला. त्यानं यावेळी तिथं उपस्थित असलेल्या महिला रिपोर्टरला जाब विचारला.
( नक्की वाचा : 'BCCI शी चर्चा झालीच नव्हती,' 'या' खेळाडूच्या निवडीमुळे अश्विननं केली निवृत्तीची घाई? )
महिला रिपोर्टरनं कोणता कॅमेेरा आणला आहे का? याबाबत विराटनं चौकशी केली. त्यावेळी आपल्याकडं कोणताही कॅमेरा नसल्याचं स्पष्टीकरण त्या रिपोर्टरनं दिलं. विमानतळाच्या बाहेर पडल्यानंतर विराटनं त्या चॅनेलशी बोलताना नाराजी व्यक्त केली.
'तुम्ही माझ्या परवानगीशिवाय फिल्म शूट करु शकत नाही. मला माझ्या मुलांसोबत प्रायव्हसी हवी आहे. तुम्ही मला न विचारता चित्रीकरण करु शकत नाही,' असं विराटनं सुनावलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
क्रिकेट फॅन्सनी त्या ऑस्ट्रेलियन चॅनेलला मर्यादा न ओलांडण्याचा सल्ला दिला. विराटच्या परवानगीशिवाय चित्रीकरण का करण्यात आलं असा प्रश्न फॅन्स विचारत आहेत.