Virat Kohli: विराट कोहलीला नक्की कशा मुली आवडतात? एक्स गर्लफ्रेंडची जबरदस्त प्रतिक्रिया; म्हणाली '12 वर्ष...'

Virat Kohli’s Ex-Girlfriend Izabelle Leite: भारतीय क्रिकेटर विराट कोहली सध्या मैदानावरच्या खेळीमुळे नाही, तर त्याच्या इंस्टाग्राम अ‍ॅक्टिव्हिटीमुळे भलताच चर्चेत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Virat Kohli's Ex-Girlfriend : विराटच्या एक्स गर्लफ्रेंडनं मौन सोडलं आहे.
मुंबई:

Virat Kohli's Ex-Girlfriend Izabelle Leite: भारतीय क्रिकेटर विराट कोहली सध्या मैदानावरच्या खेळीमुळे नाही, तर त्याच्या इंस्टाग्राम अ‍ॅक्टिव्हिटीमुळे भलताच चर्चेत आला आहे. नुकताच त्याने एका जर्मन इन्फ्लुएंसरच्या पोस्टला लाईक केल्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.त्यानंतर एका पोस्टमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड इजाबेल लीटे, पत्नी अनुष्का शर्मा, जर्मन व्लॉगर लिजलैज आणि अवनीत कौर यांचा उल्लेख करत त्याच्या निवडीवर वक्तव्य  करण्यात आलं होतं. आता या व्हायरल पोस्टवर स्वतः इजाबेल लीटेने सडेतोड उत्तर दिलं आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

काय म्हणाली इजाबेल?

व्हायरल झालेल्या त्या पोस्टमध्ये विराटच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या कमेंट्स इजाबेलला अजिबात आवडल्या नाहीत. तिने थेट कमेंट सेक्शनमध्ये जाऊन लिहिलं की, या गोष्टीला आता 12 वर्ष होऊन गेली आहेत, लोक अजूनही यातून बाहेर का पडू शकत नाहीत? तिचं हे उत्तर सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं असून अनेकांनी तिचं समर्थन केलं आहे.

Advertisement

 जुन्या गोष्टी उगाळणं चुकीचं असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. 2014 मध्ये इजाबेलने स्वतः कबूल केलं होतं की ती आणि विराट जवळजवळ 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

( नक्की वाचा : Rohit Sharma: टीममध्ये नसूनही रोहितच ठरला 'गेमचेंजर'; गुजरातविरुद्ध 'हिटमॅन'ने असा फिरवला सामन्याचा निकाल! )

विराटचं ते लाईक आणि वाद

विराटची सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटी चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने अवनीत कौरचा फोटो लाईक केल्यावरही मोठा गदारोळ झाला होता. तेव्हा त्याने अल्गोरिदमची चूक असल्याचं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा जर्मन इन्फ्लुएंसर लिजलैजच्या पोस्टला लाईक आणि नंतर अनलाईक केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 

विराटने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, स्वतः लिजलैजने म्हटलं आहे की तिला विराटबद्दल वाईट वाटतंय. एका साध्या लाईकवरून एवढी मोठी बातमी कशी काय बनू शकते, असं तिलाही कोडं पडलं आहे.

विराट सध्या आयपीएल आणि इतर स्पर्धांमध्ये व्यस्त असला तरी त्याचं खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. त्याच्या एका साध्या कृतीवरूनही इंटरनेटवर तर्कवितर्क लढवले जातात. इजाबेलच्या या प्रतिक्रियेनंतर आता तरी लोक जुन्या गोष्टी विसरतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान, विराटचे फॅन्स मात्र त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करा असा सल्ला सोशल मीडियावर देत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article