टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कारकीर्दिला उतरती कळा लागल्याचं बोललं जात आहे. कारण रोहित शर्मानंतर विराट कोहलीही रणजी ट्रॉफीमध्ये फ्लॉप ठरला आहे. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये रेल्वेविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात विराट अवघ्या 6 धावा करुन बाद झाला.
रोहित बॅटिंगसाठी मैदानात उतरला तेव्हा चाहत्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. मात्र फॅन्सचा हा उत्साह फार काळ टिकला नाही. कारण काही मिनिटातच विराट कोहली बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
(नक्की वाचा- 'बोलण्याची इच्छा नसेल तर...' अभिनेत्रीला मेसेज करण्यावर पाकिस्तानी क्रिकेटरचं उत्तर, Video)
विराट कोहली तब्बल 13 वर्षांनंतर रणजी सामना खेळताना दिसता. एवढ्या वर्षांनी दिल्लीकडून खेळताना विराटकडून चाहत्यांना बऱ्याच अपेक्षा होत्या. यश धुल बाद झाल्यानंतर विराट मैदानात उतरला, त्यावेळी हाऊसफुल झालेल्या स्टेडियममधून "कोहली, कोहली" असा आवाज येत होता. मात्र हिमांशू सांगवानने विराटला बाद करून त्याच्या चाहत्यांना गप्प केलं.
सांगवानला सुपर चौकार लगावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर इनस्विंग डिलिव्हरीवर विराट क्लीन बोल्ड झाला. विराट आऊट झाला त्यावेळी दिल्ली संघाची अवस्था 86 धावावर 3 बाद अशी होती. रेल्वे संघाने पहिल्या डावात 241 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दिल्लीने पहिल्या डावात 1 बाद 41 धावा केल्या होत्या.
कोण आहे हिमांशू सांगवान?
हिमांशू सांगवानने 2019 मध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध रेल्वेसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 29 वर्षीय हिमांशू सांगवानने आतापर्यंत 23 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 77 विकेट घेतल्या आहेत. या काळात त्याने सहा वेळा चार विकेट्स आणि तीन वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत. हिमांशू सांगवान दिल्लीच्या अंडर-19 संघाचा एक भाग होता.
(नक्की वाचा- Champions Trophy : Opening Ceremony साठी रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार? मोठी अपडेट आली समोर)
विराटसाठी बीसीसीआयचं खास नियोजन
दिल्ली विरुद्ध रेल्वे सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट करण्याचं बीसीसीआयचं काहीही नियोजन नव्हतं. मात्र विराट कोहली सारखा स्टार खेळाडू रणजी खेळणार म्हणून सामन्याचं लाईव्ह कव्हरेजची सोय करण्यात आली. रणजी सामन्यात आंतरराष्ट्रीय सामन्यासारखी गर्दी अरुण जेटली स्टेडियममध्ये होती.