Team India : 'त्यांना काढलं...' विराट-रोहितच्या निवृत्तीचे गुपित उघड! कोहलीच्या भावाचा गंभीर-आगरकरवर मोठा आरोप

IND vs SA Test Series : टीम इंडियाची कामगिरी खालावलेली असतानाच विराट कोहलीच्या भावानं खळबळजनक आरोप केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Virat Kohli, Gautam Gambhir : विराट कोहलीच्या भावानं खळबळजनक दावा केला आहे.
मुंबई:

IND vs SA Test Series : टीम इंडियाला एका वर्षात दुसऱ्यांदा मायदेशातील टेस्ट सीरिजमध्ये (Test Series) व्हाईटवॉश (Whitewash) मिळाला आहे. गुवाहाटी इथे झालेल्या टेस्ट मॅचमध्ये साऊथ आफ्रिकेने (South Africa) टीम इंडियाला 408 रननी मोठा पराभव दिला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट टीमवर, विशेषत: हेड कोच (Head Coach) गौतम गंभीरवर जोरदार टीका होत आहे. याच गदारोळात, विराट कोहलीचा (Virat Kohli) मोठा भाऊ विकास कोहलीने (Vikas Kohli) गौतम गंभीरसह अजित आगरकरच्या (Ajit Agarkar) निवड समितीवर (Selection Committee) थेट आणि गंभीर आरोप केले आहेत. टीमच्या या खराब कामगिरीसाठी या दोघांनाच तो जबाबदार धरतोय. विकासने ही पोस्ट काही वेळाने डिलीट (Delete) केली असली तरी, ती व्हायरल झाली आहे.

टीम इंडिया कमकुवत कशी झाली?

डिसेंबर 2012 पासून ते ऑक्टोबर 2024 पर्यंत भारताने मायदेशात एकही टेस्ट सीरिज गमावली नव्हती. ही मजबूत टीम विराट कोहलीच्या कॅप्टन्सीखाली उभी राहिली होती आणि 2022 च्या सुरुवातीला रोहित शर्माकडे (Rohit Sharma) त्याची जबाबदारी देण्यात आली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम फक्त मायदेशातच नाही, तर ऑस्ट्रेलियात (Australia) सलग दोन बॉर्डर-गावस्कर (Border-Gavaskar) ट्रॉफी जिंकून जगातील सर्वात यशस्वी विदेशी टीमपैकी एक बनली होती.

( नक्की वाचा : T20 World Cup 2026 Schedule: भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली! फायनलबाबत ICC चा धक्कादायक निर्णय )
 

विकासने इंस्टाग्राम थ्रेड्सवर (Instagram Threads) जुन्या आणि सध्याच्या टीममधील फरक स्पष्ट केला. जी टीम कधी परदेशात जिंकण्याची स्वप्ने बघत होता, ती आज आपल्याच घरात मॅच वाचवण्यासाठी (save the match) संघर्ष करत आहे, असं तो म्हणाला. टीमची घसरण (decline) होण्याचं कारण BCCIने (BCCI) केलेले 'अनावश्यक (unnecessary) आणि हट्टी (stubborn) बदल' आहेत, असा गंभीर आरोप विकासने केला.

विकास कोहलीनं (Vikas Kohli) सांगितलं की,  'एक वेळ होती जेव्हा आपण परदेशात जिंकायला निघायचो... आता आपण भारतातही मॅच वाचवण्यासाठी उतरत आहोत... जेव्हा तुम्ही व्यवस्थित चाललेल्या गोष्टींमध्ये जबरदस्तीने बदल करता, तेव्हा हेच घडतं...'

Advertisement

( नक्की वाचा : Harshit Rana : ''तो स्वतःच्या बळावर खेळतोय" हर्षित राणाच्या बाजूने गंभीर मैदानात, माजी कॅप्टनला फटकारले )
 

'रोहित आणि विराटची हकालपट्टी'

एका दुसऱ्या पोस्टमध्ये विकासने आणखी एक सनसनाटी दावा केला. रोहित (Rohit) आणि कोहलीने (Kohli) टेस्ट क्रिकेट सोडलं नाही, तर त्यांना टीममधून काढण्यात आलं, असं तो म्हणाला.

टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेच्या (South Africa) टीमच्या रचनेची तुलना करताना, त्याने म्हटलं की, दक्षिण आफ्रिकेनं एक संतुलीत टेस्ट टीम मैदानात उतरवली.   याउलट, भारताने सीनियर बॅटर्सना (batters) बाहेर ठेवलं, बॅटर्सच्या जागी टीममध्ये ऑलराऊंडर्सची (all-rounders) गर्दी केली आणि चक्क वॉशिंग्टन सुंदरलाही (Washington Sundar) नंबर 3 वर बॅटिंगसाठी (batting) पाठवलं.

Advertisement

विकास कोहलीनं यामध्ये सांगितलं की,  'सीनियर खेळाडूंना हटवा, 3/4/5 नंबरचे खरे बॅटर हटवा, नंबर 3 वर बॉलरला (bowler) खेळवा, टीममध्ये फक्त ऑलराऊंडर भरा, अशी टीम इंडियाची रणनीती होती. तर दक्षिण आफ्रिकेची रणनीती ही स्पेशालिस्ट (Specialist) ओपनर, स्पेशालिस्ट मिडिल ऑर्डर, स्पेशालिस्ट स्पिनर, स्पेशालिस्ट फास्ट बॉलर,  आणि फक्त एक ऑलराऊंडर, अशी होती. 
 

Topics mentioned in this article