वानखेडे स्टेडीयम आणि मुंबईकर क्रिकेटपटूंचे अनोखे नाते आहे. सुनिल गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य राहाणे यासारख्या खेळाडूंसाठीच्या मनात वानखेडे स्टेडीयमबाबत एक वेगळेच स्थान आहे. त्यांच्या जडणघडणीत या स्टेडीयमची महत्वाची भूमीका राहीली आहे. त्यामुळे या प्रत्येकाची काहीना काही आठवण या स्टेडीयम बरोबर जोडली गेली आहे. या स्टेडीयमला 50 वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने यातील प्रत्येकाने आपल्या आठवणींना उजाळा दिला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
सुनिल गावस्कर सांगतात की पहिले आम्ही ब्रेबॉन स्टेडीयमवर खेळत होते. मुंबई क्रिकेट असोसिएशनचं वानखेडे स्टेडीयम तयार झालं. त्यानंतर 1974 साली पहिल्यांदा या स्टेडीयममध्ये आलो होते. पहिलं प्रेम जसं असतं तसं वानखेडे हे आपलं पहिल प्रेम होतं. पहिल्यांदा आपण ज्यावेळी प्रेमात पडतो तसं आपल्याला वानखेडेवर आल्यावर वाटलं. मुंबईचं हे होमग्राऊंड होतं असंही ते म्हणाले. त्यामुळे वानखेडेबाबतच्या फिलिंग्स कधीही शब्दात सांगता येणार नाहीत असंही ते यावेळी आवर्जून म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - Wankhede@50: शेवटची मॅच वानखेडेवरच का खेळायची होती? सचिननं 'राज' खोललं
दिलीप वेंगसकरांनी ही आपल्यासाठी इमोश्नल मोमेंट असल्याचं सांगितलं. तर रवि शास्त्री यांनी या निमित्ताने 10 जानेवारी 1985 च्या आठवणी ताज्या केल्या. तो हाच दिवस होता ज्या दिवशी रवी शास्त्री यांनी लागोपाठ सहा सिक्स मारले होते. रवी शास्त्री म्हणाले मी वानखेडेवर खेळत होते. एका मागोमाग पाच सिक्स मारले. तो पर्यंत माझ्या मनात काही विचार नव्हता. पाच सिक्स मारल्यानंतर एक विचार आला, की या आधी केवळ सोबर्स यांनीच एका ओव्हर मध्ये सहा सिक्स मारले आहे. त्यानंतर आपणही आता सहावा सिक्स मारायचा आणि इतिहास रचायचा असं ठरवं आणि सहावा सिक्स मारला. त्यावेळी कोणतीही कॉमेन्ट्री नव्हती किंवा टेलिव्हीजन नव्हतं असं ही ते म्हणाले. सहा सिक्स मारण्याचा पराक्रम आपण याच मैदानात केला असंही ते म्हणाले.
ज्या वेळी आपण 2011 चा वर्ल्डकप जिंकला तो याच वानखेडे स्टेडीयमवर. तो विजय आपल्यासाठी बेस्ट मोमेंट ऑफ लाईफ होता असं सचिन तेंडुलकरने याने सांगितले. ज्यासाठी क्रिकेट खेळणं सुरु केलं होतं ते स्वप्न वानखेडेवर पुर्ण झालं या शिवाय कोणतही नशिब असू शकत नाही असं ही सचिन म्हणाले. दोन तीन वेळा वर्ल्डकपच्या जवळ गेलो होतो पण जिंकलो नाही. ती गोष्ट वानखेडेवर झाली. ज्या देशाने वर्ल्डकपचे आयोजन केले होते तो देश कधीही स्पर्धा जिंकू शकला नव्हता. त्याचं दडपण होतं. पण आम्ही एक मॅच इंग्लंड विरुद्ध टाय केली होती. ज्या मॅच धोनी कॅप्टन असताना टाय झाल्या होत्या त्या स्पर्धा भारत जिंकला होता. त्यामुळे तो एक होप आमच्यात होता. जर वर्ल्डकप जिंकला नसता तर आपलं क्रिकेट करिअर अपूर्ण राहीलं असतं असं ही तो म्हणाला.
ट्रेंडिंग बातमी - Wankhede@50: ...नंतर पाकिस्तान मुंबईत कधीच खेळलं नाही, 1991 साली वानखेडेवर काय घडलं?
वानखेडेवर खेळण्याचे आपले लहानपणा पासून स्वप्न होतं असं रोहित शर्मा यावेळी म्हणाला. वयाच्या 14 वर्षी वानखेडे स्टेडीयमवर रणजी मॅच पहाण्यासाठी आलो होतो. त्यानंतर या मैदानावर खेळलो. 2007 चा ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्डकप घेवून याच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आपण आलो होते. त्यावेळी आपणही पुन्हा असं करून दाखवायचं ही प्रेरणा वानखेडेवरूनच मिळाल्याचं रोहित शर्मा म्हणाला. ज्यावेळी वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी भारतात येवून काय होणार माहित नव्हते. पण मुंबईत हा कप आणावा अशी आपली इच्छा होती असं रोहित शर्मा म्हणाला. त्यानुसार आम्ही मुंबईत आलो त्यावेळचे वानखेडेवरचे सेलिब्रेशन सर्वांनी पाहीले. वानखेडेवरचा माहोल हा वेगळाच आणि प्रेरणा देणारा असतो असंही तो म्हणाला.
अजिंक्य रहाणे यांनेही आपल्या आठवणी यावेळी आवर्जून सांगितल्या. मी डोंबिवलीत रहात होतो. ट्रेन मधून नेहमी वानखेडे स्टेडीयम पहात होतो. इथं खेळायचं मन त्याच वेळी तयार केलं होतं. दक्षिण अफ्रीका आणि भारत यांच्यात वानखेडेवर मॅच होती. त्यावेळी बॉल बॉय म्हणून काम केलं होतं. त्याच वेळी भारतासाठी ही एक दिवस खेळायचं असा निश्चय केला होता. वानखेडेवर आल्यानंतर एक वेगळी एनर्जी मिळते. हीच या स्टेडीयमची ताकद आहे असंही अजिंक्य रहाणे म्हणाला. ज्या वेळी दहा बारा वर्षाचा होतो त्यावेळचा माहोल आणि आजचा माहोल याच काही फरक पडला नाही असं अजिंक्य म्हणाला.