जाहिरात

Wankhede Stadium: रेल्वे ट्रॅकवर बॉल मारा अन् दहा हजार मिळवा, वानखेडे स्टेडियमची आतली गोष्ट काय?

त्यावेळी टीकाकारांच्या या टीकेला बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं होते.

Wankhede Stadium: रेल्वे ट्रॅकवर बॉल मारा अन् दहा हजार मिळवा, वानखेडे स्टेडियमची आतली गोष्ट काय?
नागपूर:

प्रवीण मुधोळकर

मराठी माणसाच्या अपमानाला उत्तर म्हणून माझ्या बाबांनी वानखेडे स्टेडियम तेरा महिन्यात बांधून उभे केले. काही टिकाकार म्हणायचे की हे स्टेडियम घाईघाईने बांधल्याने ते कोसळेल. पण आज पन्नास वर्षे झाले तरी वानखेडे स्टेडियम दिमाखात उभे आहे अशी प्रतिक्रिया दिवंगत बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची मुलगी कुंदा विजयकर यांनी दिली आहे. त्यावेळी सिमेंटचा तुटवडा होता. अशा स्थितीत स्टेडियमचे बांधकाम थांबू नये यासाठी वानखेडे यांनी विशेष प्रयत्न केले आणि सिमेंट मिळवले. त्यामुळे स्टेडियमचे बांधकाम थांबले नाही. शिवाय त्यांनी या स्टेडीयमबाबत कुणाला माहित नसलेली गोष्टही या निमित्तांनी सांगितली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हे स्टेडीयम अवघ्या तेरा महिन्यात बांधण्यात आले होते. शिवाय ते रेल्वे ट्रॅक जवळ होते. त्यामुळे चेंडू मारला की तो सतत रेल्वे ट्रॅकवर जाईल. त्यानंतर तो तिथून आणावा लागेल अशी ही ओरड काहींनी चालवली होती. वानखेडे स्टेडियम पुर्ण झाल्यावर या स्टेडियममधील सिस्करचा बॅाल थेट मरिन लाईन्सच्या रुळावर जाईल. त्यानंतर फिल्डरला बॅाल घ्यायला रेल्वे रुळावर जावे लागेल अशी चेष्ठा ही त्यावेळी केली जात होती अशी माहिती कुंदा विजयकर यांनी दिली. पण या टीकाकारांची ही एका कृतीने बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी तोंडं बंद केली होती. 

ट्रेंडिंग बातमी - Wankhede@50: ...नंतर पाकिस्तान मुंबईत कधीच खेळलं नाही, 1991 साली वानखेडेवर काय घडलं?

त्यावेळी टीकाकारांच्या या  टीकेला बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं होते. जर  रेल्वे रुळावर बॅाल गेला तर दहा हजार रुपये बक्षिस अशी घोषणाही बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी त्याकाळी केली होती. कोणत्याही फलंदाजाने बॉल रेल्वे ट्रॅकवर मारून दाखवावा असं खुलं आव्हान वानखेडे यांनी दिली होतं. विशेष म्हणजे वानखेडे यांच्या हयातीत एकदाही बॅाल रेल्वे रुळावर गेला नाही, असं कुंदा विजयकर यांनी सांगितलं.  त्याच्या जाण्यानंतर एकदा क्रिकेटपटू संदिप पाटील यांनी लगावलेला सिस्करचा बॅाल थेट रुळावर गेला होता असं ही त्या म्हणाल्या. 

(नक्की वाचा : Wankhede Stadium 'तुम्ही घाटी लोक...' मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं मुंबईचं वानखेडे स्टेडियम )

विधानसभेतील काही तरुण आमदारांनी एका क्रिकेट सामन्यांचा प्रस्ताव बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्याकडं ठेवला. त्यांना तो प्रस्ताव आवडला. ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये हा सामना व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी वानखेडेंच्या नेतृत्त्वाखालील आमदारांच्या शिष्टमंडळानं सीसीएचे तत्कालीन अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू विजय मर्चंट यांची भेट घेतली. विजय मर्चंट यांनी वानखेडे यांची मागणी फेटाळली. त्या बैठकीत जोरदार वाद झाला. त्यावेळी तुम्ही या पद्धतीनं अरेरावी केली तर बीसीएला नवं स्टेडियम बांधावं लागेल, असं वानखेडे यांनी सुनावलं. त्यावर तुम्ही घाटी लोक कधीही असं करू शकणार नाही, असं कुत्सित उत्तर विजय मर्चंट यांनी दिलं.त्यानंतर तेरा महिन्यात वानखेडे स्टेडियम उभारलं गेलं.  
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com