जाहिरात

Garry Sobers Dies: महान क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचे निधन; 'त्या' ऐतिहासिक विक्रमाचे मानकरी हरपले

Sir Garry Sobers death news : क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दुःखद वृत्त आहे. महान ऑलराउंडर आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचे निधन झाले आहे.

Garry Sobers Dies: महान क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचे निधन; 'त्या' ऐतिहासिक विक्रमाचे मानकरी हरपले
Sir Garry Sobers death news : महान क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांचे निधन
मुंबई:

Sir Garry Sobers death news : क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दुःखद वृत्त आहे. महान ऑलराउंडर आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या अष्टपैलू खेळाने अधिराज्य गाजवणाऱ्या या जादूगाराच्या जाण्याने क्रीडा विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. 

 1958 मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यांनी आपल्या टेस्ट करिअरमधील पहिले सेंच्युरी झळकावले आणि त्याचे रूपांतर थेट 365 रनच्या मॅरेथॉन इनिंगमध्ये केले. टेस्ट क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअरचा हा वर्ल्ड रेकॉर्ड तब्बल 1994 पर्यंत कोणीही मोडू शकले नव्हते, पुढे वेस्ट इंडिजच्याच ब्रायन लाराने हा रेकॉर्ड मोडीत काढला.

एक ओव्हरमध्ये 6 सिक्स मारणारा जगातील पहिला बॅटर

गॅरी सोबर्स यांचे नाव क्रिकेटच्या इतिहासात एका खास विक्रमासाठी सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे. 1968 मध्ये ग्लॅमॉर्गनच्या सेंट हेलेन्स मैदानावर खेळताना त्यांनी एकाच ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स मारण्याचा अद्भूत पराक्रम केला होता. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारे ते जगातील पहिलेच बॅटर ठरले होते. त्यांचा हा विक्रम आजही क्रिकेट जगतात आदराने आणि आवडीने चर्चिला जातो.

ऑस्ट्रेलियाचे माजी कॅप्टन आणि प्रसिद्ध समालोचक रिकी बेनॉ यांनी एकदा सोबर्स यांचे वर्णन 'जगातील सर्वात महान अष्टपैलू क्रिकेटपटू' असे केले होते. सोबर्स हे केवळ एक उत्तम बॅटर नव्हते, तर ते अत्यंत चपळ फिल्डर होते. तसंच ते उत्तम बॉलरही होते.  ऑर्थोडॉक्स लेफ्ट आर्म स्पिन आणि मनगटाच्या साहाय्याने चायनामन स्पिन गोलंदाजी करण्यातही ते पटाईत होते. एकाच खेळाडूमध्ये हे सर्व गुण असणे ही क्रिकेट विश्वातील दुर्मिळ गोष्ट मानली जाते.

( नक्की वाचा : Rohit Sharma : गांगुली-चॅपल वादाची पुनरावृत्ती? रोहित शर्माच्या संभाव्य निवृत्तीचे कारण समजल्यावर बसेल धक्का )

 ब्रायन लाराने मोडला 'तो' रेकॉर्ड

सोबर्स यांनी 1953 मध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी बार्बाडोससाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांच्यातील अफाट टॅलेंट पाहून पुढच्याच वर्षी म्हणजेच 1954 मध्ये त्यांना वेस्ट इंडिजच्या टेस्ट टीममध्ये स्थान मिळाले. 1958 मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्यांनी आपल्या टेस्ट करिअरमधील पहिले सेंच्युरी झळकावले आणि त्याचे रूपांतर थेट 365 रनच्या मॅरेथॉन इनिंगमध्ये केले. टेस्ट क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअरचा हा वर्ल्ड रेकॉर्ड तब्बल 1994 पर्यंत कोणीही मोडू शकले नव्हते, पुढे वेस्ट इंडिजच्याच ब्रायन लाराने हा रेकॉर्ड मोडीत काढला.

करिअरमधील थक्क करणारी आकडेवारी

गॅरी सोबर्स यांनी वेस्ट इंडिजसाठी 93 टेस्ट मॅचेस खेळल्या. यामध्ये त्यांनी 57.78 च्या नेत्रदीपक सरासरीने 8032 रन केले, ज्यात 26 सेंच्युरींचा समावेश होता. यासोबतच त्यांनी आपल्या गोलंदाजीने 235 विकेट्सही घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये 5000 पेक्षा जास्त रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सोबर्स यांची बॅटिंग सरासरी आजही जगात चौथी सर्वोच्च आहे. त्यांच्या एकूण 383 फर्स्ट क्लास मॅचेसचा विचार केला तर त्यांनी 28000 पेक्षा जास्त रन केले आणि 1000 हून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

क्रिकेटमधील अतुलनीय सेवेसाठी 'सर' पदवी

आपल्या संपूर्ण आयुष्यात क्रिकेटला समृद्ध करणाऱ्या सोबर्स यांना 1975 मध्ये क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी ब्रिटिश साम्राज्याकडून नाईटहूड म्हणजेच 'सर' या पदवीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या याच महानतेचा आदर करत इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) तर्फे दरवर्षी दिला जाणारा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार हा 'सर गॅरफिल्ड सोबर्स ट्रॉफी' या नावाने दिला जातो.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com