Who is Anshul Kamboj: मँचेस्टर टेस्टमध्ये पदार्पण करणारा अंशुल कंबोज कोण आहे? कुणाला मोडता न येणारा केलाय रेकॉर्ड!

Who is Anshul Kamboj: मँचेस्टर टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या अंशुल कंबोजच्या नावावर कुणालाही न मोडता येणारा रेकॉर्ड आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Anshul Kamboj: अंशुल कंबोजला मँचेस्टर टेस्टमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे.
मुंबई:


Who is Anshul Kamboj: खेळात अनेकदा एखाद्याची दुखापत ही दुसऱ्यासाठी वरदान ठरते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळणारा फास्ट बॉलर अंशुल कंबोजला याचा अनुभव आला आहे. काही दिवसांपूर्वी कुठंही चित्रात नसलेल्या अंशुल कंबोजला मँचेस्टर टेस्टमध्ये पदार्पणाची (India vs England, India Playing XI). संधी मिळाली आहे. चौथ्या टेस्टमध्ये इंग्लंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

इंग्लंड Playing11

झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कॅप्टन), जेमी स्मिथ (विकेट किपर), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर

टीम इंडिया Playing11

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अंशुल कंबोज

अर्शदीपच्या दुखापतीमुळे मार्ग मोकळा!

रविवारी आकाश दीप चौथ्या टेस्टमधून बाहेर पडल्यानंतर, सोमवारी डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीपबद्दलही हीच बातमी आली. त्यापूर्वी अंशुलला आकाश दीपचा बॅक-अप बॉलर म्हणून टीममध्ये समाविष्ट केले होते, पण अर्शदीपच्या दुखापतीने तर अंशुलला अंतिम 11 मध्ये स्थान जवळपास निश्चित करून दिले.

Advertisement

( नक्की वाचा : IND vs PAK : भारतानं ICC स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळलं पाहिजे का? मोहम्मद सिराजनं दिलं उत्तर )
 

हरियाणाच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका

अंशुलने 2022 मध्ये हरियाणासाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण त्याने खरी कमाल व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये दाखवली. त्याच हंगामात त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (राष्ट्रीय टी-२०) मध्ये 7 मॅचमध्ये तितक्याच विकेट घेतल्या, तर पुढच्या सिझनमध्ये विजय हजारे ट्रॉफी (राष्ट्रीय एकदिवसीय ट्रॉफी) मध्ये अंशुलने 10 मॅचमध्ये 17 विकेट्स घेऊन हरियाणाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि तो राष्ट्रीय स्तरावर तो चर्चेत आला.

...आणि रचला इतिहास

2024 मध्ये अंशुलने असा पराक्रम केला, जो कुणालाही मोडता येणार नाही. फार तर त्याची बरोबरी करता येईल.  रणजी ट्रॉफीच्या जवळपास 91 वर्षांच्या इतिहासात केवळ 3 बॉलर्सना करता आला आहे. अंशुलने केरळविरुद्धच्या सामन्यात एका इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेत इतिहास रचला होता. त्यापूर्वी हा पराक्रम प्रेमांग्सु चॅटर्जी (बंगाल, 1956-57) आणि प्रदीप सोमसुंदरम (राजस्थान, 1985-86) यांनी केला होता.

Advertisement

( नक्की वाचा : Prithvi Shaw: कुणीतरी पृथ्वी शॉला हा फोटो दाखवा, इंग्लंडचा महान खेळाडू का भडकला? )
 

2024-25 चा सिझन अंशुलसाठी खूप महत्त्वाचा ठरला. त्याची भारत 'क' संघात निवड झाली. आणि येथे त्याने राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधून घेतले, जेव्हा तो केवळ 3 मॅचमध्ये 16 विकेट्स घेऊन 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरला. या कामगिरीमुळे त्याला परदेशी दौऱ्यात भारत 'अ' संघाचा सदस्य बनवले.

Topics mentioned in this article