धोनी आणि रैना 15 ऑगस्टलाच रिटायर का झाले? दोन्ही खेळाडूंच्या जर्सीशी आहे खास कनेक्शन

Why did MS Dhoni and Suresh Raina retire on 15th August? : आजच्या दिवशी 4 वर्षांपूर्वी संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला होता.

Advertisement
Read Time: 2 mins
M
मुंबई:

Why did MS Dhoni and Suresh Raina retire on 15th August? : आजच्या दिवशी 4 वर्षांपूर्वी संपूर्ण क्रिकेट विश्वाला धक्का बसला होता. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आणि तडाखेबंद बॅटर सुरेश रैना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या दोघांनीही निवृत्त होण्यासाठी 15 ऑगस्ट या दिवसाचीच निवड का केली ? या प्रश्नाची आजही अनेकांना उत्सुकता असते. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर आम्ही त्यांंचं उत्तर देणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आजपासून साधारण एक वर्षांपूर्वी सुरेश रैनानं दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यानं याचं कारण सांगितलं होतं. रैनानं दिलेल्या माहितीनुसार दोन्ही खेळाडूंनी हा निर्णय त्यांनी अचानक घेतलेला नव्हता. त्यांनी बराच विचार करुन निवृत्त होण्याची तारीख निवडली होती. 

काय आहे कारण?

टीम इंडियाच्या स्टार खेळाडूनं हे रहस्य उलगडून सांगताना दोघांचाही जर्सी क्रमांक सांगितला. धोनीचा जर्सी क्रमांक 7 होता. तर सुरेश रैना 3 क्रमांकाची जर्सी घालत असे. दोन्ही नंबर एकत्र केले तर 73 हा नंबर तयार होतो. 2020 साली देशाचा 73 वा स्वातंत्र्य दिवस होता. त्यामुळे आम्ही त्याच दिवशी निवृत्तीची घोषणा घेण्याचा निर्णय घेतला. 15 ऑगस्ट 2020 पेक्षा उत्तम दिवस कोणताही नव्हता.

( नक्की वाचा : IPL 2025 : धोनीच्या भवितव्याला BCCI च्या नियमाचा अडथळा )
 

धोनी आणि रैनानं टीम इंडियासाठी मोठं योगदान दिलं आहे. धोनीनं भारताकडून एकूण 538 सामने खेळले. त्यामधील 526 इनिंगमध्ये 172666 रन त्यानं काढले. धोनीच्या नावावर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 1 डबल सेंच्युरी, 16 सेंच्युरी आणि 108 हाफ सेंच्युरी आहेत. त्याचबरोबर धोनीच्या कॅप्टनसीखालीच भारतीय टीमनं T20 वर्ल्ड कप, वन-डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या 3 आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. 

Advertisement

तर, सुरेश रैनानं टीम इंडियाचं 322 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. त्यामधील 291 इनिंगमघ्ये त्यानं 7987 विकेट्स घेतल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रैनाच्या नावावर 7 सेंच्युरी आणि 48 हाफ सेंच्युरी आहेत. रैनानं 150 इनिंगमध्ये बॉलिंग करत 62 विकेट्स घेतल्या. 

Topics mentioned in this article