Rishabh Pant : ऋषभ पंतनं दिल्ली कॅपिटल्स सोडण्याचा निर्णय का घेतला? उघड झालं कारण

Rishabh Pant : ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सचं 9 वर्षांचं नातं का तुटलं याचं कारण एका रिपोर्टमधून उघड झालं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Rishabh Pant : ऋषभ पंत आणि दिल्ली कॅपिटल्सचं 9 वर्षांचं नातं संपुष्टात आलं आहे.
मुंबई:

Why Rishabh Pant Decided To Leave Delhi Capitals? :  आयपीएल 2025 पूर्वी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी दिल्ली कॅपिटल्सनं ऋषभ पंतला ( Rishabh Pant) रिटेन न करण्याचा निर्णय घेतला. पंत 2016 पासून दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल खेळत होता. दिल्लीनं पंतला मुक्त केलं. टीम इंडियाचा ऑल राऊंडर अक्षर पटेल त्यांनी रिटेन केलेला पहिला खेळाडू ठरला. पंत आणि दिल्ली कॅपिटल्सचं 9 वर्षांचं नातं का तुटलं याचं कारण एका रिपोर्टमधून उघड झालं आहे. 

पंतनं का सोडली दिल्ली?

'पीटीआय'नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक जीएमआर समुहानं घेतलेल्या निर्णयावर पंत नाराज होता. दिल्ली कॅपिटल्समध्ये जेएसडब्ल्यू समुह आणि जीएमआर समुहाची 50-50 टक्के मालकी आहे. त्यांच्यातील करारानुसार पुढील दोन सिझन (IPL 2025, IPL 2026) GMR समुह दिल्ली कॅपिटल्सची टीम चालवणार आहे. त्यांनी टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये बदल केला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दिल्ली कॅपिटल्सचा कोच म्हणून हेमांग बदानी आणि क्रिकेट संचालक म्हणून वेणूगोपाल राव यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयावर पंत नाराज होता. त्याचबरोबर GMR समुह पंतला हटवून अक्षर पटेलला कॅप्टन करण्याच्या विचारात होता. त्या निर्णयावर देखील पंत नाखुश होता. 

पंतला दिल्ली कॅपिटल्सनं 2016 साली झालेल्या ऑक्शनमध्ये खरेदी केलं होतं. त्यानंतर गेल्या दोन मेगा ऑक्शनपूर्वी पंतला रिटेन करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर मागील मेगा ऑक्शनमध्ये तो फ्रँचायझीसोबत ऑक्शन टेबलवरही दिसला होता. 

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2025 : KKR मॅनेजमेंटची मोठी चूक, शाहरुख खानला लागला 12 कोटींचा चुना, तुमच्या लक्षात आलं का? )

जीएमआर समुहानं आगामी दोन सिझनसाठी टीमची सूत्र हाती घेताच रिकी पॉन्टिंग सोबतचा करार संपवण्याचा निर्णय घेतला. पॉन्टिंग गेल्या सात वर्षांपासून टीमचा हेड कोच होता. टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीलाही त्यांनी क्रिकेट संचालक पदावरुन हटवलं. या बदलामुळे पंत नाराज होता आणि त्यानं मेगा ऑक्शनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आगामी मेगा ऑक्शनमध्ये त्याला सर्वाधिक बोली लागण्याची शक्यता आहे. 
 

Topics mentioned in this article