Women's Premier League auction 2025: सिमरन शेख हिचं नावा आता प्रत्येकाच्या तोंडावर आहे. त्याला कारणही तसेच आहे. महिला क्रिकेट प्रिमियर लीगमध्ये ती सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. तिला गुजरात जायंट्स ने तिला 1.9 करोड रूपयांना खरेदी केलं आहे. सिमरन या आधी युपी वॉरियर्स कडून खेळली आहे. मात्र यावेळी तिला गुजरात जायंट्स संघाने खरेदी केलं. वूमन प्रिमियर लिंगच्या ऑक्शनमधील अनकॅप्ड भारतीय खेळाडूमधील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. सिमरन मुंबई आणि इंडिया ई संघाकडून खेळली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सिमरनचं नाव ज्या वेळी ऑक्शनसाठी आलं त्यावेळी संपुर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं असं सिमरनच्या आईने आयएएनएस बरोबर बोलताना सांगितले. क्रिकेट खेळताना सिमरन बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. तिच्यावर टीका ही झाली. पण तीने केवळ खेळावर लक्ष केंद्रीत केलं असंही तिच्या आईने सांगितलं. काही जण तर हिचं खेळणं बंद करा असं म्हणत होते. मी ही तिला सांगत होते. तु खेळू नको. लोकं काही पण बोलतात. चांगलं बोलत नाहीत. तु कोणाचं नाही तर आपल्या आईचं तरी ऐक असं मी तिला सांगत होते. पण तिने कोणाचंही ऐकलं नाही. ती केवळ क्रिकेट खेळत राहीली. ती आता वेगळ्या उंचीवर पोहचली आहे. त्यावेळी तिचे सर्वच जण कौतूक करत आहेत असंही त्या म्हणाल्या.
ट्रेंडिंग बातमी - IND vs AUS : RRR मुळे वाचली टीम इंडियाची लाज, गाबा टेस्टची ड्रॉ च्या दिशेनं वाटचाल
सिमरन धारावीमध्ये 10X16 च्या घरात राहाते. तिच्या कुटुंबात चार बहिणी आणि तिन भाऊ आहेत. सिमरन मुळे आता आमचं आयुष्य बदलेल असं तिचे वडील जाहिद अली सांगतात. आता आम्ही एक फ्लॅट विकत घेवू. त्यामुळे माझ्या मुलांना चांगले जिवन देता येईल असं त्यांनी सांगितलं. सिमरन जे जी कामगिरी केली आहे त्यामुळे आपण खुश आहोत असंही ते म्हणाले. जेव्हा घरातली एक मुलगी अशी कामगिरी करते तेव्हा सर्वात जास्त आनंद बापाला होतो असंही ते म्हणाले. आम्ही सर्वांनी मिळून हा क्षण एका उत्सवा प्रमाणे साजरा केला असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - SMAT : मध्य प्रदेशवर मात करत मुंबईने दुसऱ्यांदा जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
सिमरन ही 22 वर्षाची आहे. ती मधल्या फळीत बॅटींग करते. गेल्या वेळी तिला युपी वॉरिर्यर्सने 10 लाखात खरेदी केले होते. 2023 च्या स्पर्धेत तिने 9 सामन्यात 29 धावा केल्या होत्या. त्यानंतर तिने आपल्या खेळात सुधार केला. या वर्षा झालेल्या वरिष्ठ महिलांच्या T20 स्पर्धेत तिने आपली छाप पाडली आहे. तिने जवळपास 100.57 च्या स्ट्राईक रेटने 176 धावा केल्या. शिवाय चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तिने केवळ 40 चेंडू खेळले होते. त्यात तिने 7 षटकार आणि 6 चौकार लगावत आपली चुणूक दाखवली होती.