India vs Australia 3rd Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा दिवस पावसाचा अडथळा आणि तळातील भारतीय बॅटर्सची झुंजार खेळी यामुळे गाजला. चौथ्या दिवशी पावसामुळे वारंवार खेळ थांबवावा लागला. अखेर दिवसभराचा खेळ संपला तेव्हा भारतानं 9 आऊट 252 रन केले होते. ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये 445 रन केले होते. त्यामुळे भारताला फॉलो ऑन टाळण्यासाठी 246 रनची आवश्यकता होती. आता गाबा टेस्टचा एकच दिवस शिल्लक आहे. त्यामुळे ही टेस्ट ड्रॉ होण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
RRR नं वाचवली लाज
भारतीय टीमची फॉलोऑनची नामुश्की टाळण्यामध्ये RRR फॅक्टर निर्णायक ठरला. यामधील पहिला R आहे ओपनिंग बॅटर केएल राहुल (KL Rahul). दुसरा आर आहे ऑल राऊंडर रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja). तर तिसरा R म्हणजे पाऊस अर्थात रेन. राहुल-रविंद्र-रेन या RRR फॅक्टरला बुमराह आणि आकाश दीप या तळाच्या जोडीनंही तोलामोलाची साथ दिल्यानं टीम इंडियाला फॉलो ऑन टाळण्यात यश आलं.
ओपनिंगला बॅटिंगला आलेल्या KL राहुलनं एका बाजूला नेटानं किल्ला लढवत 84 रन केले. राहुलनं 139 बॉलमध्ये 8 फोरच्या मदतीनं ही खेळी केली. राहुलनं पर्थ टेस्टमध्येही एका बाजू लावून धरत बॅटींग केली होती. गाबामध्ये टॉप ऑर्डरचे अन्य सर्व बॅटर्स फेल गेले. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत आणि रोहित शर्मा या पाच जणांपैकी फक्त एकट्या रोहित शर्माला दोन अंकी रन, ते देखील फक्त 10 रन काढता आले. पण, राहुलनं 84 रन करत फॉलो ऑन टाळण्यात योगदान दिलं. दुर्दैवानं राहुलची सेंच्युरी हुकली पण, शंभर नंबरी खेळी म्हणून या खेळीची नोंद झाली आहे.
( नक्की वाचा : तुम्ही Google केलं पाहिजे... बुमराहनं केली ऑस्ट्रेलियन मीडियाची बोलती बंद )
या सीरिजमध्ये पहिल्यांदाच संधी मिळालेल्या रविंद्र जडेजानं आपण जगातील अव्वल ऑल राऊंडर का आहोत? हे गाबामध्ये दाखवून दिलं. जडेजा आणि राहुलनं 67 रनची भागिदारी केली. राहुल आऊट झाल्यानंतर जडेजानं बॅटिंगची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. त्यानं नितीश कुमार रेड्ीसोबत सातव्या विकेटसाठी 53 रनची भागिदारी केली. जडेजानं 123 बॉलमध्ये 7 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 77 रन काढले.
4-4 चं समीकरण
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा टेस्टचा पाचवा आणि शेवटचा दिवस उद्या (बुधवार, 18 डिसेंबर) आहे. शेवटच्या दिवशी ही टेस्ट ड्रॉ झाली तर दोन्ही टीमना 4-4 पॉईंट्स दिले जातील. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपच्या फायनलमध्ये जाण्याची टीम इंडियाची आशा कायम राहील. अर्थात फायनलमधील प्रवेश करण्यासाठी भारतीय टीमला या सीरिजमधील उर्वरित दोन टेस्ट जिंकाव्या लागतील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world