World Parkour Day: जागतिक पार्कोर दिवस! अडथळ्यांशी संघर्ष शिकवणारा साहसी खेळ, जाणून घ्या इतिहास

World Parkour Day: उड्या मारणे, चढणे, झेप घेणे, झाडांवरून किंवा भिंतींवरून चढणे-उतरणे अशा विविध हालचालींचा समावेश असतो. काय आहेत या खेळाची वैशिष्ट्ये? वाचा....

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पुणे: आज जगभरात पार्कोर डे साजरा केला जातोय. 1980 च्या  दशकात फ्रान्स मधील नॉमर्डि प्रदेशातून या खेळ आला , या खेळाचे जनक डेव्हिड बेले यांना मानले जाते, त्यांचे वडील रेमंड बेले यांनी सैनिकी प्रशिक्षणावर आधारित आणि अग्निशमन दलात वापरण्यात येणाऱ्या हालचालींचा उपयोग करून विकसित केला. पुढे डेव्हिड बेले यांनी आपल्या वडिलांच्या या खेळात अधिक बदल करून या खेळ पुढं आणला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पार्कोर हा एक शारीरिक क्रिया करणारा खेळ आहे ज्यामध्ये व्यक्ती अडथळ्यांवर मात करत वेगाने आणि कार्यक्षमतेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये धावणे, उड्या मारणे, चढणे, झेप घेणे, झाडांवरून किंवा भिंतींवरून चढणे-उतरणे अशा विविध हालचालींचा समावेश असतो. काय आहेत या खेळाची वैशिष्ट्ये? वाचा....

1. नैसर्गिक अडथळ्यांवर मात: भिंती, कठडे, झाडं, इमारती इ. गोष्टींवरून सहजतेने हालचाल करणे.

2. शारीरिक क्षमतेचा विकास: शरीर संतुलन, ताकद, वेग आणि लवचिकता यांचा विकास होतो.

3. सर्जनशीलता आणि एकाग्रता: अडथळ्यांवर मात करताना मार्ग शोधणे आणि त्यात सर्जनशीलता वापरणे आवश्यक असते.

4. स्वतंत्र शैली: प्रत्येक व्यक्तीची पार्कूर करण्याची पद्धत वेगळी असते – त्यामुळे याला एक कला मानले जाते.

(नक्की वाचा - Urine Therapy: परेश रावल यांनी सलग 15 दिवस प्यायली होती स्वत:चीच लघवी; शरीरावर काय परिणाम होतो?

 दरम्यान, अलीकडच्या काळात भारतातही पार्कूर लोकप्रिय होत आहे. अनेक तरुण यामध्ये रस घेत आहेत आणि याचे प्रशिक्षण घेण्यासाठी विविध संस्था सुरू झाल्या आहेत. पार्कूर खेळताना सुरक्षिततेचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते, कारण चुकीची हालचाल अपघात घडवू शकते. त्यात तेवढी काळजी घेणे ही अपेक्षित आहे, पिंपरी चिंचवड मधील सुयश गोरे हा तरुण या खेळात पारंगत झाला असून त्याने या खेळात 2024 मध्ये 9 फूट उंचीवरून सर्वात उंच एक पायरी पाम फ्लिप फ्रॉम द ग्राउंड हा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. 

(नक्की वाचा - Pahalgam attack: हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानचा थरकाप, POK मधील दहशतवादी तळाची 'अशी' झाली स्थिती)