'मला माफ करा...'; ऑलिम्पिकच्या धक्क्यानंतर विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा; चाहत्यांना धक्का!

Advertisement
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने जड अंत:करणाने कुस्तीला अलविदा केलं. तिने ट्विटरवर पोस्ट करीत आपल्या निवृत्तीची घोषणा केली. विनेशने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं... आई, कुस्ती जिंकली पण मी हरले. माफ कर मला. तुझं स्वप्न... माझी हिंमत सर्व संपलंय. याहून अधिक ताकद राहिली नाही माझ्यात. अलविदा कुस्ती. कायम तुमची ऋणी राहीन.. माफ करा...!

ऑलिम्पिकमध्ये अवघ्या 100 ग्रॅममुळे स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर विनेशने तिच्या करिअरमधला मोठा निर्णय घेतला आहे. विनेश फोगाटने अचानक निवृत्तीची घोषणा केल्यामुळे भारतीय नागरिकांमध्ये निराशा आहे. तिने हिंमत सोडू नये अशी आशा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

Advertisement

मात्र संपूर्ण भारताची जनता विनेशच्या पाठीशी उभी आहे. तिने खचून जाऊ नये आणि ताकदीने उभं राहावं... आम्हाला तिचा अभिमान असल्याचे ट्विट चाहत्यांकडून केले जात आहे. इतकच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी विनेशचं कौतुक केलं आहे.