Video : एका ओव्हरमध्ये 39 रन! युवराज सिंहचा रेकॉर्ड तुटला, अनोळखी खेळाडूची सनसनाटी कामगिरी

Yuvraj Singh 17-Year Old World Record Broken: T20 इंटरनॅशनल मॅचमधील एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन करण्याचा युवराज सिंहचा रेकॉर्ड तुटला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
Y
मुंबई:

Yuvraj Singh 17-Year Old World Record Broken: युवराज सिंह म्हंटलं की त्यानं 2007 साली झालेल्या पहिल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये एकाच ओव्हरमध्ये काढलेले 36 रन आठवतात. इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉडच्या ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावत त्यानं हा विक्रम केला होता. टीम इंडियाच्या 'सिक्सर किंग'चा गेल्या 17 वर्षांपासून अबाधित असलेला हा रेकॉर्ड अखेर तुटला आहे. टी20 वर्ल्ड कपच्या सब रिजनल इस्ट एशिया पॅसिफिक क्वालिफायर मॅचमध्ये हा चमत्कार झालाय. या मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये तब्बल 39 रन निघाले आहेत. 


( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बॉलर्सच्या चुकीचा फायदा

समोआ विरुद्ध वानूआतू या मॅचमध्ये हा रेकॉर्ड झाला. सामोचा 28 वर्षांचा क्रिकेटपटू डेरियस विसरनं (Darius Visser) 15 व्या ओव्हरमध्ये हा विक्रम केला. त्यानं फास्ट बॉलर नलिन निपिकोच्या 6 बॉलवर 6 सिक्स लगावले. नलिननं या ओव्हरमध्ये 3 नो बॉल टाकले. त्यामुळे या ओव्हरमध्ये तब्बल 39 रन निघाले. 


T20 इंटरनॅशनलमधील एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन

39 - डेरियस विसर (समोआ) वि. वानूआतू - 2024
36- युवराज सिंह (भारत) वि. इंग्लंड - 2007
36 - कायरन पोलार्ड (वेस्ट इंडिज) वि. श्रीलंका - 2021
36 - रोहित शर्मा/रिंकू सिंह (भारत) वि. अफगाणिस्तान - 2024
36 - दिपेन्द्र सिंह ऐरी (नेपाळ) वि. कतार - 2024
36 -  निकोलस पूरन (वेस्ट इंडिज) वि. अफगाणिस्तान - 2024

Advertisement

समोआचा क्रिकेटपटू डेरियस विसर टी20 इंटनॅशनल मॅचमधील एका ओव्हरमध्ये 39 रन काढणारा जगातील एकमेवर बॅटर बनला आहे.  विसरनं या मॅचमध्ये फक्त 62 बॉलमध्ये 132 रनची आक्रमक खेळी केली. या खेळीत त्यानं 14 सिक्स आणि 5 फोर लगावले. सामोआनं पहिल्यांदा बॅटिंग करत वानूआतूसमोर विजयासाठी 175 रनचं लक्ष्य ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना वानूआतूचा 10 रननं पराभव झाला.

( नक्की वाचा : 'कॅप्टन म्हणून बॉलर योग्य, कारण...' बुमराहनं सांगितली 'मन की बात' )
 

कसे झाले एका ओव्हरमध्ये 39 रन ?

पहिला बॉल - 6
दुसरा बॉल - 6
तिसरा बॉल - 6
चौथा बॉल - नो बॉल 1
चौथा बॉल - 6
पाचवा बॉल - 0
सहावा बॉल बॉल - नो बॉल 1
सहावा बॉल - नो बॉलवर सिक्स 6+1
सहावा बॉल - 6

Advertisement

एकूण 39 रन. या बॉलरनं 9 बॉलची ओव्हर टाकली. त्यामध्ये 3 नो बॉल होते.
 

Topics mentioned in this article