Yuvraj Singh Recalls Decision To Retire From Cricket: युवराज सिंगने नुकतेच केलेल्या विधानामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. सानिया मिर्झाच्या पॉडकास्टमध्ये युवराज सिंगने खुलासा केलाय की, करिअरच्या शेवटच्या काळात त्याला योग्य तो आदर मिळाला नाही. युवराजने जून 2019मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्ती घेतली होती. निवृत्तीमागील धक्कादायक कारण त्यानं सांगितलंय. युवराजने म्हटलंय की, मला माझ्या गेममध्ये मजा येत नव्हती. मला वाटत होते की जेव्हा मला क्रिकेट खेळण्यात आनंदच येत नाही, तर मी का खेळतोय? मला पाठिंबा मिळतोय असे वाटत नव्हते. मला सन्मान मिळतोय असेही वाटत नव्हते आणि जेव्हा हे सगळेच माझ्याकडे नाही, तेव्हा हे सर्व करण्याची गरज काय? ज्या गोष्टीत मला आनंद मिळत नाही, त्याला मी का चिकटून राहू? मी खेळतच का राहावे? काय सिद्ध करण्यासाठी? मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या मी यापेक्षा जास्त करू शकत नव्हतो आणि ही गोष्ट मला दुखावत होती. ज्या दिवशी मी क्रिकेट सोडले, त्या दिवशी मी पुन्हा पूर्वीसारखा झालो."
कारकिर्दीतील खास आठवणींना दिला उजाळा
युवराजने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सुरुवातीच्या काळाच्या आठवणींनाही उजाळा दिला. तो स्वतः किशोरवयीन असताना नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते आणि त्या घटनेला युवराज यांचे वडील योगराज सिंग यांनी वैयक्तिकरित्या घेतले होते. याबाबत युवी म्हणाला की,"आता जेव्हा मी त्या गोष्टीकडे पाहतो, तेव्हा मला वाटते की त्यांच्याकडे मला नीट पाहण्यासाठी वेळही नव्हता. ते फक्त माझ्या वडिलांशी चांगले वागत होते. कारण ते भारतासाठी खेळत होते, त्यामुळे कदाचित त्यांनी तसे म्हटले असेल. तेव्हा मी फक्त 13-14 वर्षांचा होतो आणि खेळ शिकत होतो. मी ते वैयक्तिकरित्या घेतले नाही, पण माझ्या वडिलांनी ते मनावर घेतले.”
(नक्की वाचा: Shocking news: क्रिकेटविश्वात खळबळ! माजी खेळाडूच्या मुलाने घरकाम करणाऱ्या मुलीवर केले अत्याचार)
युवराज सिंगला भारतातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक मानले जाते. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 11,778 धावा आणि 148 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या कारर्किदीतील तो उत्कृष्ट फील्डर म्हणूनही ओळखला जायचा आणि त्यानं अनेक संस्मरणीय कॅच देखील पकडले आहेत. वर्ष 2007 साली स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये मारलेल्या सहा सिक्सव्यतिरिक्त चाहत्यांना 44 वर्षीय युवराजची आजही 2011च्या वर्ल्डकप मॅचमधील शानदार खेळीही लक्षात आहे. अशा परिस्थितीत युवराज सिंग यांनी असे विधान करणे, हे निश्चितच त्यांच्या चाहत्यांना निराश करणारे आहे