जाहिरात

Yograj Singh : 'हिंदी ही बायकी भाषा', युवराज सिंहचे वडील योगराज यांचं वादग्रस्त वक्तव्य

Yuvraj's father Yograj Singh's controversial statement: युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Yograj Singh : 'हिंदी ही बायकी भाषा', युवराज सिंहचे वडील योगराज यांचं वादग्रस्त वक्तव्य
Yograj Singh controversial statement on hindi
मुंबई:

Yuvraj's father Yograj Singh's controversial statement: युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. योगराजनं यावेळी हिंदी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. हिंदी ही बायकांची भाषा असल्याचा दावा योगराज सिंह यांनी केलाय. त्यांनी नुकतीच यूट्यूब चैनल 'अनफिल्टर्ड बाय समदिश' ला नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले योगराज?

योगराज यांच्या विचारानुसार, महिलांनी हिंदी बोलणे ठीक आहे. पण, पुरुषांनी पंजाबीसारखी भाषा बोलली पाहिजे. त्यामुळे तुम्ही बोल्ड दिसाल.' या मुलाखतीमध्ये योगराज यांनी सांगितलं की, 'मला हिंदी भाषा एखादी बाई बोलत असल्यासारखी भाषा वाटते. एखादी बाई बोलत असेल तर खूप चांगलं वाटतं. पण, जर पुरुष हिंदी बोलत असेल तर असं वाटतं की हा काय बोलतोय? हा कसला पुरुष आहे? मला हा फरक स्पष्ट दिसतो. 

( नक्की वाचा : Yograj Singh : युवराज सिंहचे वडील योगराज कपिल देवला गोळी का मारणार होते? रागाचं कारण काय? )
 

महिला कुटुंबप्रमूख नको

योगराज सिंह यांनी या मुलाखतीमध्ये अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. महिलांना कधीही कुटुंबप्रमुख करु नये. कारण त्या घर उद्धवस्त करतात, असा दावाही योगराज यांनी केला. भारतीय क्रिकेटपटूनं याबाबत सांगितलं की, 'त्या तुमचं घर उद्धवस्त करतील. इंदिरा गांधी यांनी हा देश चालवला आणि नंतर बरबाद केला, याचा मला खेद आहे. त्यांना प्रेम आणि आदर द्या. पण, कधीही सत्ता देऊ नका.' 

सोशल मीडियावर योगराज सिंह यांचं हे वक्तव्य चांगलंच व्हायरल झालं आहे. या वक्तव्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

 या मुलाखतीमध्ये महान क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचे कॅप्टन कपिल देव यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आपण कपिल देवला गोळी घालण्यासाठी त्याच्या घरी पोहोचलो होतो, असा गौप्यस्फोट योगराज यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: