Yuzvendra Chahal आणि Dhanashree Verma वेगळे होणार? 'या' निर्णयानंतर चर्चेला उधाण

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma : टीम इंडियाचा लेग स्पिनर यजुवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्यात कटूता निर्माण झाल्याची चर्चा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma : टीम इंडियाचा लेग स्पिनर यजुवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्यात कटूता निर्माण झाल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या घटस्फोटाची अफवा जोरदार आहे. या दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं. इतकंच नाही तर चहलनं धनश्रीसोबत पोस्ट केलेले सर्व फोटो डिलीट केले आहेत. धनश्रीनं आत्तापर्यंत चहलला अनफॉलो केलंय पण, त्याच्यासोबतचे फोटो डिलिट केलेली नाहीत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

घटस्फोट नक्की?

'टाईम्स ऑफ इंडिया' ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचा घटस्फोट आता अटळ आहे. त्याबाबतची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. या दोघांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण, त्यांनी आता स्वतंत्रपणे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे, असं सूत्रांनी स्पष्ट केलं. 

धनश्रीनं 2023 मध्ये 'चहल' हे आडनाव इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हटवल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. युजवेंद्र चहलनं 'New life loading' अशी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केल्यानंतर लगेच धनश्रीनं ही कृती केली होती. 

त्यानंतर युजवेंद्र चहलनं स्वतंत्र पोस्ट लिहीत घटस्फोटाची चर्चा फेटाळली होती. त्याचबरोबर त्याच्या आणि धनश्रीबद्दलच्या नात्यांबाबत पसरलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं फॅन्सना आवाहन केलं होतं. 

( नक्की वाचा : हार्दिक आणि नताशानं केली घटस्फोटाची अधिकृत घोषणा, मुलाच्या संगोपनाबाबत घेतला निर्णय )
 

धनश्री आणि युजवेंद्र चहलनं 11 डिसेंबर 2020 रोजी लग्न केलं होतं. धनश्री कोरिओग्राफर आहे.  झलक दिखला जा 11 सिझनमध्ये धनश्रीनं तिची लव्हस्टोरी शेअर केली होती. 'लॉकडाऊनमध्ये सर्व जग बंद होतं. त्यावेळी घरी बसून कंटाळलेल्या युजवेंद्र चहलनं मला डान्स शिकवण्याची विनंती केली होती. त्यानं सोशल मीडियावर माझे अनेक व्हिडिओ पाहिले होते. त्यानंतर त्यानं एके दिवशी मला डान्स शिकवण्याची विनंती केली होती. मी त्याची विनंती मान्य केली,' असं धनश्रीनं सांगितलं.
 

Advertisement