पिंपरी चिंचवड मधून पिंपरी चिंचवडमध्ये अठरा वर्षीय तरुणीची भर रस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील वाल्हेकरवाडी परिसरातील कृष्णाई नगर परिसरातली ही घटना आहे. दोन तरुणांनी पाठलाग करून या तरुणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलंय. कोमल जाधव असं मृत मुलीचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या या दोन तरुणांनी कोमलवर वार करत तिची हत्या केली.