महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभलेली आहे...त्यातील नाथ महाराजांच्या परंपरेचा एक वेगळाच वारसा आहे. नाथ महाराजांनी भारुडाच्या मार्फत सर्वांचं प्रबोधन केलं.आणि त्याचाच वारसा वारीमध्ये चालत आहे. वारीमध्ये भजन,कीर्तन,अभंग, गवळण याचबरोबर भारुडा मार्फत प्रबोधन केलं जातं.सामाजिक संदेश जावा यासाठी भारुडात अनेक प्रकारे प्रबोधन केले जातं.वारीमध्ये सोंगी भारुड कशा पद्धतीने असतं त्याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी.