छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी मंदिर गोमूत्र शिंपडून मंदिर स्वच्छ केल्याचा प्रकार समोर आलाय..या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्यात... अब्दुल सत्तार यांनी रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिरात महाशिवरात्र निमित्ताने आज दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर काही तरुणांनी सत्तारांच्या याच दर्शनावरून आक्षेप घेतलाय.. अब्दुल सत्तार सकाळी मांसाहार करतात त्याशिवाय घर सोडत नाही त्यामुळे त्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात प्रवेश देण्याला विरोध करत या तरुणांनी मंदिरात गोमित्र शिंपडून मंदिर स्वच्छ केल्याचं सांगण्यात आलं..