मुंबई पोलीस दलातील 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरनूलकडे देवदर्शनासाठी जात असताना त्यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसली, ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र पोलीस दलात शोक पसरला आहे