Ajit Pawar गेले; काही तासातच मंत्रालयात धक्कादायक प्रकार; 75 शाळांना घाईघाईने अल्पसंख्यांक दर्जा

सरकारी अधिकाऱ्यांचा निर्ढावलेपणा पुन्हा एकदा समोर आलाय. अजित पवारांचं 28 जानेवारीला अपघाती निधन झालं.. मात्र दादांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांमध्येच मंत्रालयात फायलींवर सह्या होत होत्या.. अजित पवारांच्या निधनानंतर शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली. तरीही 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अजित पवारांच्या मृत्यूदिवशीच 7 शाळांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं.. शासकीय कार्यालयांची वेळ संपल्यावरही संध्याकाळी साडे सहा तसंच सात वाजताही फायलींवर सह्या झाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून ही प्रक्रिया स्थगित होती.. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे आणि अजित पवार यांनी यापूर्वी ही प्रमाणपत्रे रोखून धरली होती. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर अचानक ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा आरोप होतोय..या सगळ्या प्रकारावर प्यारे खान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.तसंच अशा प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे... मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे... या प्रकरणाची चौकशी व्हावी संबंधितावर कारवाई व्हावी. अशी मागणी अंबादास दानवेंनी केलीय.यावर संदीप देशपांडेंनी काय म्हटलंय पाहुयात

संबंधित व्हिडीओ