अजित पवार यांची दुपारी चार वाजता आज पत्रकार परिषद होणार आहे. धनंजय मुंडे यांच्या संदर्भातल्या आरोपांना अजित दादा उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर अजित पवार काय बोलणार? या आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नुकतीच त्यांनी काल दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची सुद्धा भेट घेतलेली आहे आणि आपली भूमिका धनंजय मुंडे संदर्भातली ही स्पष्ट केली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष असेल.