अंबरनाथच्या महात्मा फुले नगर परिसरात क्रिकेट खेळत असलेल्या ११ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपहरणकर्त्याने मुलाच्या वडिलांना फोन करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती.या घटनेची गंभीर दखल घेत डीसीपी सचिन गोरे आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली असून, मुख्य आरोपी हकीक खान याला अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.