Chh. Sambhajinagar|बाजार समितीतील आवक 70 टक्क्यांनी घटली; लासुर स्टेशन बाजार समितीमधून घेतलेला आढावा

बातमी आहे दुष्काळाची दाहकता दाखवणारी....दुष्काळ म्हणजे फक्त शेतात पिकं जळणं किंवा शेतकऱ्यांचं नुकसान होणं एवढंच मर्यादित नाही. कारण आता या दुष्काळाची झळ थेट बाजारपेठेलाही बसू लागली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर स्टेशनची तब्बल 70 वर्षांची जुनी बाजारपेठ आज अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहे. ज्या बाजार समितीत गेल्या वर्षी याच काळात दिवसभरात जवळपास 100 ट्रॅक्टर शेतीमाल घेऊन दाखल होत होते, त्याच बाजार समितीत आता अवघे 10 ते 15 ट्रॅक्टर येत आहेत. म्हणजेच शेतमालाची आवक प्रचंड घटली आहे. बाजार समितीतील आवक जवळपास 70 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती समोर येत आहे. याच लासुर स्टेशन बाजार समितीमधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी

संबंधित व्हिडीओ