४ मे २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळून तीन जवान शहीद झाले आहेत. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग ४४ वर बॅटरी चष्माजवळ सकाळी सुमारे ११:३० वाजता झाला. जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरकडे जात असताना, चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळला.