मुंबईतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरांपैकी वडाळा येथील विठ्ठल मंदिर हे एक आहे... हे मंदिर पुरातन असून ४०० वर्षापूर्वी उभारण्यात आले आहे... मुंबईतील आणि मुंबई शेजारील शहरातील ज्यांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हे मंदिर एक प्रतिपंढरपूर म्हणून आहे. या मंदिरात वारकऱ्यांची विठ्ठल भक्तांची मोठ्या प्रमाणात विठू रायाच्या दर्शनासाठी गर्दी झालेली पाह्याला मिळत आहे.