पंढरीच्या वाटे दिंड्या पताका लोळती...देवा त्या विठ्ठलाचं साधु रिंगण खेळती..आज राज्यभरात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिभावाचं... आनंदाचं...उत्साहाचं वातावरण आहे... रात्री अडीचच्या दरम्यान विधिवत विठ्ठलाची पूजा संपन्न झालीय.... गळ्यात तुळशी हार, कपाळी चंदनाचा टीळा... असं विठ्ठलाचं साजरं, सुंदर रुप डोळ्यात साठवून घेण्यासाठी वारकऱ्यांनी रीघ लावली आहे... जवळपास महिना, दीड महिना चालत आलेल्या वारकऱ्यांना, आज कुठे सारे कष्ट दूर गेल्याची भावना आहे...यंदा याच वारकऱ्यांपैकी एक कैलास उगले आणि त्यांच्या पत्नी कल्पना उगले यांना विठ्ठलाची पूजा करण्याचा सन्मान प्राप्त झालाय... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते देखील विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झालीय... बा विठ्ठला, बळीराजाची संकटं दूर कर... रोगराई समूळ नष्ट कर... आणि राज्यात सुख, समृद्धी नांदू दे...असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठूरायाला घातलंय...