ठाण्यामध्ये डॉग केअर सेंटर मध्येच श्वानांना मारहाण झाली आहे. सेंटर मधील कर्मचाऱ्यांकडनं श्वानांना जबर मारहाण झालीये. मारहाणीमध्ये एका श्वानाने आपला डोळा गमावला आहे. डॉग केअर सेंटर विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यातल्या रहिवासी अभिषेक कुमार यांना परदेशात जायचं असल्याने त्यांनी येऊरच्या डॉग एंड पेट केअर सेंटर मध्ये आपल्या दोन श्वानांना ठेवलेलं होतं.