दहावी बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतलाय. ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील, त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक आणि कर्मचारी नेमले जाणार नाहीत.इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडळास दिले आहेत