सैफ अली खान हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर येतेय.सैफच्या घरात आरोपीनं हल्ल्याच्या दिवशी डोळे आणि चेहरा झाकण्यासाठी जो कपडा वापरलाय तो पोलिसांना सापडलाय. जेव्हा सैफ अली खान आणि शहजादमध्ये भांडण झालं त्यावेळी तो कपडा आरोपीच्या तोंडावरुन खाली पडला.पोलिसांनी हा कपडाचा तुकडा फॉरेन्सिकसाठी पाठवला आहे. पोलिसांना सैफच्या घरातून आरोपीच्या बोटांचे 19 ठसे पुरावे म्हणून मिळाले आहेत.