मुंबई महापालिकेतील नवीन सभागृहाची एक झलक समोर आली आहे. महापालिका मुख्यालयासमोर आझाद मैदानालगत असलेल्या महापालिका जिमखान्याच्या जागेवर सहा मजली इमारत उभारण्याचे नियोजन आहे . या प्रकल्पासाठी तब्बल ३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे.