बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव तालुक्यातील टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता एक्कावन्न वरती पोहचली आहे. तीनच दिवसात टक्कल पडत असल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेतली गेली आहे. शेगाव तालुक्यामध्ये आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण सुरु करण्यात आलेलं आहे. चर्मरोग तज्ञांचं पथक आता गावात दाखल झालंय. कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावामध्ये तपासणीही सुरु करण्यात आलेली आहे.