मुंबईतील तीन बहुप्रतीक्षित पुलांचं लोकार्पण, CM Fadnavis यांच्या हस्ते होणार लोकार्पण | NDTV Marathi

मुंबईतील तीन बहुप्रतीक्षित पुलांचं लोकार्पण, CM Fadnavis यांच्या हस्ते होणार लोकार्पण | NDTV Marathi Three highly anticipated bridges in Mumbai to be inaugurated by CM Fadnavis मुंबईतल्या तीन बहुप्रतिक्षित पुलांचं अखेर उद्घाटन करण्यात येणार आहे. सायन रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार पूल आणि GMLR च्या पहिल्या टप्प्याचं आज लोकार्पण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी १ वाजता विद्याविहार पुलावरून तिन्ही पुलांचं लोकार्पण होणार आहे. यामुळे सायन–धारावी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून विद्याविहार पुलामुळे पूर्व–पश्चिम जोडणी अधिक सुलभ होणार आहे. GMLR च्या पहिल्या टप्प्यामुळे गोरेगाव–मुलुंड प्रवासाला गती मिळण्यास मदत होणार असून तीनही प्रकल्पांमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

संबंधित व्हिडीओ