मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या 'चलो मुंबई' आंदोलनापूर्वी बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी लावलेल्या फलकावरून ओबीसी आणि मराठा समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला. यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही समाजांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.