बीडच्या गेवराईमध्ये काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यामध्ये गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राडा झाला होता...यामध्ये लक्ष्मण हा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली होती... यानंतर आता एकूण 14 लोकांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.