धाराशिवमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जिल्हा परिषद एबी फॉर्म वाटपावरून सुरू असलेला गोंधळ चव्हाट्यावर आलाय.धाराशिवचे शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी आणि युवा सेनेचा सदस्य अविनाश खापे यांच्यातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतेय.राजन साळवी यांनी धाराशिवमधील शिवसेनेची जिल्हा परिषद उमेदवारांचे एबी फॉर्म भाजप आमदार राणा पाटील आणि त्याचा मुलगा मल्हार पाटील यांच्याकडे सोपवल्याचा आरोप होतोय.साळवींनी शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप आमदाराकडे का दिले? असा सवाल युवासेना सदस्य अविनाश खापेंनी विचारलाय. दरम्यान राजन साळवींनी एबी फॉर्म भाजप आमदाराकडे दिल्याची कबुली ऑडिओ क्लिपमध्ये दिली. यामुळे शिवसेनेतील उमेदवारीचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय... व्हायरल ऑडिओ क्लिप NDTV मराठीच्या हाती आली.