मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आणि पीक कर्जाच्या थकबाकीचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे विविध बँकांचे मिळून तब्बल ७७२ कोटी रुपयांचे पीक कर्ज थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.