बदलापूरमध्ये भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या घराजवळ गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरच्या दर्गा मोहला परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. अल्ताफ शेख नावाच्या व्यक्तीवर हा गोळीबार झाला आहे. दोन गटांमध्ये हा वाद झाला आणि त्यानंतर गोळीबार करण्यात आला. राजकीय वादातून हा गोळीबार झाल्याचं समजतंय.