GBS Update | राज्यभरात GBSमुळे 12 मृत्यू, नागपुरात 1 तर सांगलीत 2 जणांचा मृत्यू | NDTV मराठी

जीबीएस चा पहिला बळी गेला तर सांगलीमध्ये दोन जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे आता राज्यामध्ये जीबीएस मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पंधरा वर पोहोचली आहे. नागपूरच्या पारडीमध्ये राहणारे पंचेचाळीस वर्षीय रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर वर होते. त्यांचा मृत्यू झालाय तर आणखी दोन रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत पण त्यांची प्रकृती सध्या ठीक असल्याचं कळतंय. दुसरीकडे सांगली मध्ये जीबीएस मुळे दोघा मृत्यू झालेला असून दोन्ही रुग्ण हे बाहेरच्या जिल्ह्यातले आहेत अशी माहिती आहे. मिरजेतील शासकीय रुग्णालयामध्ये एका चौदा वर्षाच्या मुलाचा आणि साठ वर्षांच्या वृद्धेचा मृत्यू झालाय. 

संबंधित व्हिडीओ