Global News|रशिया-युक्रेन युद्ध सुरूच, रशियाचे अनेक हल्ले परतवल्याचा युक्रेनचा प्रतिदावा| NDTV मराठी

रशियानं पूर्व युक्रेनमधील दोन गावांवर ताबा मिळवल्याचा दावा शनिवारी रशियाकडून करण्यात आला. तर युक्रेननं शनिवारीच रशियाचे अनेक हल्ले परतवून लावल्याचा प्रतिदावा केलाय.गेल्या २४ तासांमध्ये डोनेत्स्क परिसरातील झेलेनी गेई आणि निप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्ट मधील मालिव्का या गावांवर रशियन नियंत्रण प्रस्थापित झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिलीय.रशियानं युक्रेनच्या लष्करी औद्योगिक प्रकल्पांसह काही ड्रोन गोदामांनाही लक्ष्य केल्याची माहिती मिळतेय.तसंच युक्रेनच्या २५७ ड्रोनना निकामी केल्याचीही माहिती रशियानं दिलीय.तर रशिया युक्रेनमध्ये ६९ वेळा संघर्षाचे प्रसंग उद्भवले अशी माहिती युक्रेनकडून जारी करण्यात आलीय. आदल्या दिवशीच रशियाच्या स्ताव्रोपोलमध्ये युक्रेननं हल्ला केला होता.

संबंधित व्हिडीओ