इस्रायल हमास युद्धाला आता दीड वर्षाहून अधिक काळ उलटलाय. युद्ध थांबण्याऐवजी अधिक चिघळताना दिसतंय. त्याहूनही गंभीर परिस्थिती आहे ती गाझातील सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांची.... आंतरराष्ट्रीय मदत तर पुरवली जातेय. मात्र ही मदत घेण्यासाठी जाणाऱ्या पॅलेस्टिनींचा इस्रायली हल्ल्यांमध्येच बळी जातोय. शिवाय अफुऱ्या अन्नपुरवठ्यामुळे भूकबळी जात आहेत ते वेगळेच... आतापर्यंत इस्रायली हल्ल्यांत सुमारे 59 हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय. तर कुपोषणामुळे, उपासमारीमुळे सुमारे ९०० जणांचा मृत्यू झालाय. पाहूया हमास-इस्रायली भांडणात युद्धबळी ते भूकबळीपर्यंतचा पॅलेस्टिनींचा प्रवास....