Global Report| थायलंड-कंबोडिया संघर्ष थांबणार?,पुन्हा ट्रम्प यांची वादात उडी; युद्ध थांबवा नाहीतर...

थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील संघर्ष थांबण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. याला कारण ठरलाय तो अमेरिका अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. ट्रम्प यांनी दोन्ही देशांना युद्ध थांबवा असा ज्येष्ठत्वाचा सल्ला दिलाय. आणि या सल्ल्याला दोन्ही देशांना प्रतिसादही दिलाय. दोन्ही देश सोमवारी मलेशियामध्ये वाटाघाटींना सुरुवात करणार आहेत. मात्र हा तंटा सोडवताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान संघर्षाचा दाखलाही दिलाय. आणि त्यांच्या मनातली सल अलगद समोर आलीय. दुसरीकडे थायलंड कंबोडियामध्ये ज्या मंदिरावरून हा संघर्ष पुन्हा पुन्हा उफाळून येतोय तशी अनेक मंदिरं दोन्ही देशांमध्ये आहेत. त्यांचाही या रिपोर्टमधून आढावा घेण्याचा हा प्रयत्न....

संबंधित व्हिडीओ