तलवार गहाळ झाल्याच्या आरोपांनंतर तुळजाभवानी मंदिर संस्थानने तातडीने लेखी खुलासा करत स्पष्टीकरण दिले आहे. यानुसार, मंदिरातून कोणतीही तलवार गहाळ झाली नसून, शस्त्र पूजनाची तलवार सुरक्षित आहे. तलवार दैनंदिन पूजेसाठी वकोजी बुवा मठात ठेवली असल्याची माहिती मंदिर संस्थानने दिली आहे.