नागपुरातून प्रशासकीय कामकाजाबाबत एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका बीअर बारमध्ये भरदुपारी काही अधिकारी शासकीय फाईल्स घेऊन बसलेले आणि दारूचे घोट घेत त्यावर सह्या करत असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.