मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करण्यास कोर्टाने मनाई केली आहे. शांततापूर्ण आंदोलनासाठी सरकारने नवी मुंबईतील खारघर येथे पर्यायी जागा देण्याचा पर्यायही खुला ठेवला आहे.